आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पात्र १८ लाख ३० हजार ५६० पैकी १४ लाख ८५ हजार ३१ लाभार्थींनी पहिला तर ११ लाख ४३ हजार ७४५ जणांनी दुसरा कोविड प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला आहे. अर्थात ३ लाख ४५ हजार ५२९ लाभार्थींनी अजूनही पहिला डोस घेतलेला नाही, तर पहिल्या डोसनंतर ३ लाख १ हजार ९४८ लाभार्थी दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. मात्र त्यांनीसुद्धा लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग घटल्याने नागरिकांची भीती दूर झाल्यामुळे लसीकरण मंदावल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे, यामुळे संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर आहे.
कोविडअनुरूप वर्तन, बाधा झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले यशस्वी औषधोपचार तर दुसरीकडे लसीकरणाचा चढता आलेख यामुळे कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यामुळे सरकारने ३१ मार्च २०२२ रोजी निर्बंध शिथिल करत मास्क वापरण्याचा निर्णयही ऐच्छिक केला. परिणामी कोरोनाबद्दलची लोकांच्या मनातील भीती काहीशी कमी झाली. उत्तरोत्तर कोविडनुरूप वर्तनाकडेही दुर्लक्ष होत गेले व आता कोरोना गेला असा कयासही अनेकजण लावू लागले.
मात्र, मागील १५ दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वरती काढले असून दिल्ली, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सक्रिय रुग्णही वाढले आहेत. आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ८१ टक्के तर दुसरा डोस घेणारे फक्त ६२ टक्के लाभार्थी आहेत. सुरक्षिततेसाठी पहिला, दुसरा व प्रीकॉशनरी असे डोस घेतल्यास धोका टाळता येऊ शकतो, यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.