आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी प्रकल्प:बालोद्यानाच्या विकासामुळे आता मुले मोबाइल, टीव्ही सोडून बागेत खेळतील; लायन्स क्लबच्या बालोद्यान

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या परिस्थितीत मुले मोबाईल आणि टिव्हीमध्ये गुंतून पडत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी लायन्स क्लबच्या सहकार्याने श्रीकृष्ण रुक्मिणीनगर चॅरिटेबल फाउंडेशनने विकसित केलेल्या श्रीकृष्ण रुक्मिणी बालोद्यान आणि जॉगिंग ट्रॅक या स्थायी प्रकल्पाचे लोकार्पण प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या हस्ते आणि आमदार कैलास गोरंट्याल, नियोजित प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, सुभाष देविदान, भास्कर दानवे, कमलबाबू झुनझुनवाला, कमल गोयल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान, येत्या १५ दिवसात मुलांसाठी स्लाईडर, सीसॉ झोका, स्विंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दिलीप मोदी म्हणाले, प्रांतीय पुरस्कार वितरणानंतर बहुतांश संस्थांचे कामकाज थांबते. परंतु, लायन्स क्लब ऑफ जालना हा एकमेव क्लब आहे, ज्याच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड यांनी आपल्या कार्यकाळाला १५ दिवस शिल्लक असताना कायमस्वरूपी प्रकल्प राबवला आहे. लायन्स क्लबला यावर्षी क्षेत्रिय, प्रांतीय, बहुप्रांतिय असे ४५ पुरस्कार मिळाले आहेत आणि इंटरनेशनलकडुन देखिल क्लबला बॅच मिळाला आहे. पुरुषोत्तम जयपूरिया यांनी सांगितले, महिलांच्या हातात कामाची सूत्रे दिली तर त्या आपल्या सामर्थ्याने यशस्वीरित्या कर्तव्य दक्षतेने कार्य पार पडतात, याचे उदाहरण म्हणजे लायन्स क्लब ऑफ जालनाच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड आणि त्यांची टीम आहे. आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, आपण स्वतः क्लबमध्ये कार्यरत असून, क्लबच्या प्रकल्पांना सर्वतोपरी सहकार्य करून हे बालोद्यान विकसित करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विशेष सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविकात मिनाक्षी दाड म्हणाल्या, पदभार घेतल्यापासुन मनात ठाम निश्चय होता की, एकतरी स्थायी प्रकल्प क्लबचा व्हायलाच पाहिजे. याकरीता खुप प्रयत्न करत राहिलो आणि आज लायन्स क्लब ऑफ जालन्याच्या ५५ वर्ष जुन्या क्लबमध्ये एक अतिशय सुंदर असा स्थायी प्रकल्प उभारण्यात आला असून, या बालोद्यानाच्या विकासामुळे मुले मोबाईल आणि टीव्ही सोडून बागेत खेळतील आणि त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला. सुत्रसंचालन प्रेमलता लोया यांनी तर जयश्री लढ्ढा यांनी आभार मानले. यावेळी सरला मोदी, विजय दाड, गणेश कामड, शाम लोया, गोविंद सांकला, जीवन सले, जगत घुगे, राजेंद्र करवा, उर्मिला करवा, प्रमोद रुणवाल, संगीता रुणवाल, डॉ. प्रवीण लढ्ढा, डॉ. प्रतिक्षा लढ्ढा, रविन्द्र शर्मा, संगीता शर्मा, मोहन राठोड़, मीरा राठोड़, व्दारकादास मुंदड़ा, वंदना मुंदड़ा, राकेश लोहिया, बबिता लोहिया, पियुश मुंदड़ा, पुजा मुंदड़ा, डॉ. गोविंद झंवर, डॉ. श्रद्धा झंवर, डॉ राम गिराम, डॉ. शितल गिराम, डॉ. रोहित कासट, डॉ. प्रियंका कासट, विनित साहनी, सुनिल बियाणी, अंकुश राऊत, अशोक हुरगट, ललित जैन, लॉ. किशोर गुप्ता, गीता गुप्ता, लॉ. राजेश कामड, जगदीश भुतडा, योगेश उजवणे, नारायण चाळगे, संगीता चाळगे, डॉ. विठ्ठल पवार, डॉ. गिरीश पाकनिकर, डॉ. माधुरी पाकनिकर, राजेश देविदान, अनिता देविदान, नंदकिशोर अग्रवाल, रामनारायण अग्रवाल, राजेश लुणिया, बालाप्रसाद भक्कड, संगीता भक्कड, नरेंद्र भंडारी, पुजा भंडारी, मधुसूदन मुंदड़ा, स्वप्ना मुंदड़ा, गोविंदप्रसाद मुंदड़ा, सुरेश मुथा, लॉ. अशोक कोटेचा, अरुण मित्तल, स्मिता मित्तल, कविता शर्मा, मधु पित्ती उपस्थित होत.

बातम्या आणखी आहेत...