आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कता:जालन्यातील काेराेना बाधित महिलेची प्रकृती गंभीर, नवे 44 संशयित भरती

जालना3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दु:खी नगरात सर्वेक्षण, लक्षणे असलेले ५ जण रुग्णालयात

येथील जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती झालेल्या कारोनाबाधित महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी नवे ४४ रुग्ण भरती झाले असून यात ३९ जण निजामाबाद येथून प्रवास करून आलेले तर ५ जण स्थानिकचे आहेत. तसेच मागील दोन दिवसांत भरती झालेल्या १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून शुक्रवारी पुन्हा दहा नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच  १२ अहवाल येणे बाकी अाहेत.  गुरुवारी सकाळी पाठवलेल्या १० स्वॅबपैकी ४ जिल्हा रुग्णालयात कोराना बाधित महिलेवर उपचार करताना संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे असून ६ इतरांचे आहेत. दरम्यान, कोरेाना बाधित महिलेच्या थेट संपर्कात एकूण ६१ जण आले होते. त्यातील ४४ स्वॅब सुरुवातीला पाठवले हाेते. यापैकी २६ बुधवारी तर गुरुवारी १४ अहवाल आले असून ते निगेटिव्ह आहेत. मात्र, संपर्कातील आणखी अहवाल येणे बाकी असून यातच गुरुवारी पुन्हा ४ कर्मचाऱ्यांचे स्वॅब पाठवण्यात आले आहेत. संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅबसुद्धा ५ दिवसांच्या फरकाने पाठवण्यात येत आहेत. बाधितांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब दोन वेळा पाठवण्यात येणार अाहेत. 

जनरल वाॅर्डातही सुरक्षा महत्वाची

सर्वप्रथम अपघात विभागात रुग्ण आल्यावर डॉक्टर तपासणी करून त्याला जनरल किंवा लक्षणानुसार कोरोना वाॅर्डात संशयित म्हणून भरती करतात. दरम्यान, पहिली कोरोना बाधित महिला ही जनरल वाॅर्डातूनच कोरोना वाॅर्डात हलवण्यात आली होती. बुधवारीसुद्धा पुन्हा एक महिला जनरल वाॅर्डातून कोरोना वार्डात हलवली असून तिला न्यूमोनियाची लक्षणे दिसून आली आहेत. तिचा स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा म्हणून अपघात विभाग असो की जनरल वाॅर्ड याठिकाणी पीपीई कीट, एन-९५ मास्क व अन्य सुरक्षाविषयक साधने मिळावी, अशी मागणी होत आहे. मात्र, किटचा तुटवडा असल्याचे कारण देत काेरोना वाॅर्डासाठीच ही साधने दिली जात असल्याने अन्य वाॅर्डातील कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून ड्युटी करत आहेत.

दु:खी नगरात तपासणी, ५ रुग्ण पाठवले जिल्हा रुग्णालयात

कोेेेेेेेरानाबाधित महिला ज्या दु:खी नगरात राहते त्या भागात २० पथकांकडून १ हजार ११९ कुटुंबाचे ७ एप्रिलपासून सर्वेक्षण सुरू आहे. यात ३२५० पुरुष, २९१० महिला, २०१० लहान मुले व १८७० मुली असे एकूण दहा हजार ४० जण आहेत. दरम्यान, सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असणारे बुधवारी १ तर गुरुवारी ४ जण या पथकाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनी यांनी दिली.

दोन दिवस प्रतिसाद नाही, अधिकारी अाल्याने देताहेत माहिती

दु:खी नगरातील लोकांनी ७ व ८ एप्रिल रोजी आरोग्य पथकांना पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. मात्र, जि. प. सीईओ नीमा अरोरा, नगरपालिका मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी भेटी देऊन आवाहन केल्यावर आता माहिती मिळत आहे.  १ हजार ११९ कुटुंबांचे १४ सलग दिवस सर्वेक्षण करण्यात येणार असल्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. आरोग्य पथकात १ एएनएम, एक आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्ती  व एक पोलिस आहे. 

बातम्या आणखी आहेत...