आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, अंबड तालुक्यातील जामखेड येथील घटना

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला, बिबट्यानेच हल्ला केल्याचा ग्रामस्थांचा अंदाज

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना अंबड तालुक्यातील जामखेड येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार सदरील महिला शेतात कापूस वेचायला गेली होती. मात्र रात्री घरी न परतल्यामुळे तिचा शोध घेतला असता महिलेचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत आढळला.

प्रयागबाई म्हस्के (65) असे मृत महिलेचे नाव आहे. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याचा शोध घेतला जात आहे. शरीराचे लचके तोडलेले असल्यामुळे बिबट्यानेच हल्ला केला असावा अशी शक्यता ग्रामस्थांसह पथकाने व्यक्त केली आहे. शनिवारी ही महिला शेतात कापूस वेचायला गेली होती. रात्री परत न आल्याने तिचा शोध घेतला असता हा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे.

बातम्या आणखी आहेत...