आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; एका आरोपीला अटक

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी शिवारातील एका पुलाखाली एका ४० ते ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह रविवारी आढळून आला होता. त्या महिलेच्या डोक्यावर, छातीवर दगडाचे घाव घातलेले असल्याने तिची ओळख पटणे अवघड झाले होते. घनसावंगी पोलिसांनी तपास करून एका आरोपीला जेरबंद केले आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.

घनसावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपासचक्रे जोराने फिरवली. त्यानंतर ही मृत महिला लिंबोणी येथील गंगुबाई काळे ही असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून तिच्या संपर्कात असलेल्या महिलेकडून माहिती घेतली असता ती मृत महिला शनिवारी रात्री तीर्थपुरी येथील महादेव कडुकर नामक व्यक्तीच्या सोबत दुचाकीवरून गेल्याचे पुढे आले होते. पोलिस निरीक्षक महाजन व त्यांच्या पथकाने तीर्थपुरी येथून कडुकर यास ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने त्या महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. सदर महिला आरोपीकडे

१ लाख रुपयांच्या मागणीचा तगादा लावत असल्याने त्याने कंटाळून तिचा खून केल्याचेही पोलिस निरीक्षक महाजन यांनी सांगितले. गुन्हा उघड करण्यासाठी गायके यांची मोलाची कामगिरी ठरली. पोलिस निरीक्षक महाजन, पीएसआय संतोष मरळ, विठ्ठल वैराळ, सुनील वैद्य, गायके महाराज, रमेश राऊत, सीमा चौधरी आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.

बातम्या आणखी आहेत...