आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:समाजाच्या विकासात महिला कायम अग्रस्थानी‎

मंठा‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला समाजाच्या विकासाच्या‎ प्रगतीमध्ये कायम अग्रस्थानी आहेत.‎ महिलांचा सन्मान कायम केला गेला‎ पाहिजे, असे प्रतिपादन संदीप‎ बाहेकर यांनी केले.‎ मंठा तालुक्यातील केंधळी येथील‎ विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये ''नारी‎ शक्तीचा सन्मान'' या कार्यक्रमांतर्गत‎ मीच होणार होम मिनिस्टर हा‎ कार्यक्रम संपन्न झाला. या‎ कार्यक्रमास‎ छत्रपती संभाजी नगर येथील‎ निवेदक नितीन दीक्षित यांची विशेष‎ उपस्थिती होती. या कार्यक्रमांतर्गत‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विविध खेळ व कलागुणांना वाव‎ देणारे कार्यक्रम घेण्यात आले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्यक्रमादरम्यान इयत्ता सहावीतील‎ विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली.‎

आयोजित कार्यक्रमात श्रीमती‎ सुजाता निखिल घारे यांचा प्रथम‎ क्रमांक आला असून प्रियंका‎ बालासाहेब गवळी द्वितीय, संगीता‎ कालिदास दडस या तृतीय विजेत्या‎ ठरल्या. विजेत्या महिलांना संगीता‎ शिंदे यांच्याकडून मानाची पैठणी व‎ नथ बक्षीस देण्यात आली.‎ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ प्राचार्या रश्मी यादव, विजय राठोड,‎ काजल शहा, सपना मणियार,‎ स्वाती वायाळ, भाग्यश्री ठाकरे,‎ रोहिणी सुरडकर, प्रतीक्षा साबू,‎ अनुजा शेळके, पूजा इंगळे, वैभव‎ गोरे यांच्यासह आदींनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...