आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्स्यपदक:महिलांना संधी दिल्यास त्या नक्की यशस्वी होतात ; रोटरीच्या कार्यक्रमात प्रतिपादन

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना संधी दिल्यास त्या नक्की यशस्वी होतात, असे प्रतिपादन डॉ. पुनम दुसेजा यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन तर्फे गणेशोत्सवानिमित्त बेटी पढाव बेटी बचाव बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बेटी पढाओ बेटी बचाओ होर्डिंगचे उद्घाटन बडीसडक येथे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला मिडटाऊनचे अध्यक्ष धवल मिश्रीकोटकर, सागर दक्षिणी, प्रणय अग्रवाल, अॅड. महेश धन्नावत, दिपांग अग्रवाल, मोना भक्कड, सोनिया मिश्रीकोटकर, अॅड. अश्विनी धन्नावत, कस्तुरी धन्नावत आदींची उपस्थिती होती. डॉ. दुसेजा म्हणाल्या, रोटरीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. श्री गणेश हे आज्ञाकारी पुत्र तथा महिलांना सन्मान देणारे दैवत म्हणून ओळखले जातात व कोणतेही शुभकार्य त्यांना आमंत्रीत करून वंदनाने केले जाते. त्यामुळे या दिवसापासून प्रत्येकाने महिलांचा सन्मान करेल, अशी प्रतिज्ञा घेऊन त्यादिशेने कार्य करावे. महिलांना संधी द्यावी, त्या निश्चितच त्याचे सोने करेल. मला ज्याप्रमाणे संधी दिली गेली त्याचप्रमाणे सर्वांना संधी मिळावी, अशी मनोकामना व्यक्त केली. दरम्यान, डॉ. पुनम दुसेजा या एम.डी. पॅथॉलॉजी असून त्यांचे पती डॉ. प्रकाश हे सुद्धा डॉक्टर आहे. त्यांनी एम.डी. पॅथॉलॉजी जे. एम.सी. नागपूर येथून केलेली आहे व त्यांचे पती हे अंतराष्ट्रीय कोच असून, त्यांनी भारत देशाचे प्रतिनिधीत्व सुद्धा युथ वर्ड चॅम्पीयनशिपसाठी आर्चरीसाठी केले होते. त्यांनीच डॉ. पुनम यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच दिक्षा घेणे डॉ. पुनम यांनी नॅशनल आर्चरी चॅम्पीयनशिप मध्ये २००२ मध्ये कान्स्यपदक सहा महिन्याच्या बाळासह मिळवले होते.

बातम्या आणखी आहेत...