आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:महिलांना ग्रामपंचायत शिपायाकडून मारहाण; गुन्हा दाखल

जालना3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी सोडले जात नसल्याने आम्हाला पाणी का मिळत नाही? असा जाब विचारणाऱ्या महिलांना ग्रामपंचायतच्या शिपायाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पाचनवडगाव येथे घडली. शिपायाने काठीने मारहाण केल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे.

जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी सोडले जात नसल्याने महिला ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. या वेळी महिलांना ग्रामपंचायतच्या शिपायाने बेदम मारहाण केल्याच्या आरोप या महिलांनी केला आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणी जखमी महिलांसह गावातील इतर महिलांनी मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत शिपायाच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. सोनाली शिवसिंग चांदा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तालुका जालना पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान, मारहाण करणाऱ्या शिपायासह सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी आणि या तिघांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावे. आम्हाला सरपंच, ग्रामसेवक आणि शिपाई चालत नाही अशी मागणी या वेळी महिलांनी केली. दरम्यान, या वादावर ग्रामसेवकांनीदेखील प्रतिक्रिया दिली. ग्रामपंचायत शिपायाने महिलांवर हात उचलला असून त्यावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले. पाइपलाइनचे काम चालू आहे. त्यामुळे पाणी येत नसल्याचे त्यांनी या वेळी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...