आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान दिन:जालना शहरातील माऊलीनगरात महिलांनी साजरा केला संविधान दिन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील अंबड रोडवरील माऊली नगर येथील महिलांनी एकत्र येत २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक याचे वाचन करून भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांनी भारतीय महिलांना संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्य यावर त्यांनी चर्चा केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान दिन महिलांनी साजरा करत असताना एकमेकींना गोडधोड खाऊ घालून आणि रांगोळी काढून मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा केला. यावेळी माऊली नगर येथील कु.पूर्वा हंडे, कु.ऋतुजा आव्हाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले. सुषमा भाकड, रेखा गिराम, डॉ.गोदावरी खेडेकर, मीना आनंदे,गीता जमधडे, वर्षा वखारे, उषा वखारे, अलका आव्हाड, जयश्री हंडे, कल्पना सुलताने, लता नागरे, मंगल मोरे, अनिता भोसले यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...