आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:महिला उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा; माजी नगरसेविका संध्या देठे यांचे प्रतिपादन

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटीर उद्योग करणाऱ्या महिलांना व्यवसाय भरभराटीसाठी स्किल इंडियाअंतर्गत अमेझिंग लोकल्स ही संकल्पना उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा सेतू असून तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे सुकर होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेविका संध्या देठे यांनी बोलताना व्यक्त केला.

स्किल इंडिया उपक्रमांतर्गत हॉटेल अमित येथे महिला उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संध्याताई देठे बोलत होत्या. राष्ट्रीय शेफ कीर्ती अग्रवाल, रेश्मा लाखे, प्रशिक्षक शिवकुमार खरात, आयोजिका पूजा जाधव यांची उपस्थिती होती. प्रशिक्षक शिवकुमार खरात यांनी महिलांच्या उत्पादनांना स्थानिक पातळीवर व्यापारी तसेच व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी “अमेझिंग लोकल ते व्होकल’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कीर्ती अग्रवाल यांनी महिलांच्या उन्नतीसाठी उडान ग्रुपच्या कार्याची माहिती देऊन अमेझिंग लोकल्सला सहकार्य राहील, असे सांगितले. रेश्मा लाखे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात पूजा जाधव यांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या उत्पादनांना जालना शहरात अल्पावधीतच मिळत असलेला प्रतिसाद, उत्पादक, व्यापारी व ग्राहक सेतू संकल्पना या विषयावर माहिती दिली. यशस्वी उद्योजिका सपना अग्रवाल, उषा वाघ, नलिनी शिंदे यांचा या वेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन पूनम लाहोटी यांनी केले. कार्यशाळेस महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...