आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगारावर मार्गदर्शन:महिला, युवतींनी घेतले कोरफडीपासून विविध उत्पादनांच्या निर्मितीचे प्रशिक्षण

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरफड ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म दिसून येतात, परंतु या वनस्पतीविषयी फारशी माहिती नाही. या वनस्पतीचा उपयोग आयुर्वेदिक औषधी व सौन्दर्य प्रसाधनात चांगल्या रीतीने करता येतो. याचाच विचार करून कोरफड विषयी सखोल माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी व याचा वापर दैनंदिन जीवनात व्हावा, तसेच महिलाकरिता हा एक परवाडणारा शेतिला पूरक असा व्यवसाय देखील होऊ शकतो, या अनुषंगाणे कृषी विज्ञान केंद्र खरपूडी जालना अंतर्गत गृहविज्ञान विभागामार्फत ग्रामीण महिला व युवतींसाठी “कोरफड पासून विविध उत्पादने निर्मित्ती” या विषयावर चार दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणाचे उदघाटन निवृत्त उपप्राचार्य बी. वाय. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे कृषि अभियंता प्रा. पंडित वासरे, कृषि विज्ञान केंद्राचे अन्नतंत्र विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. एस. एस. पाटील, गृहविज्ञान तज्ञ एस. एन. कऱ्हाळे यांची उपस्थिती होती. उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा एस. आर. कळम यांनी विविध औषधी वनस्पती व त्याचा उपयोग याविषयी मार्गदर्शन केले.

सगरोळी केविकेच्या प्रमुख डॉ. माधुरी रेवनवार गृहविज्ञान विभाग यांनी कोरफडचे महत्व व यावरील उत्पादने व वाव या विषयी महिलांनाऑनलाईन माध्यमाद्वारे माहिती दिली, तर उद्योग उभारणीसाठी महिलांची मानसिकता, या विषयावर प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला. प्रा शाशिकांत पाटील यांनी पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग विषयी सविस्तर माहिती सांगितली तर सगरोळी येथील यशस्वी उद्योजिका स्वाती चिंचोले यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून स्वतःच्या कोरफड उत्पादन, प्रक्रिया व विक्री व्यवस्थापनाविषयी सर्वाना आपले अनुभव सांगितले.

प्रा कऱ्हाळे यांनी कोरफडीचे औषधी गुणधर्म या विषयी मार्गदर्शन केले व औरंगाबाद येथील आरसेटीच्या मार्गदर्शीका अर्चना जिंदानी यांनी कोरफड पासून विविध उत्पादने जसे की, जेल, शाम्पू हँडवॉश, सरबत, तेल, साबण यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थिनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रा वरील विविध युनिटला भेट देऊन केविकेचे उपक्रम जाणून घेतले. समारोप प्रसंगी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ सोनुने यांनी महिलांनी विविध ठिकाणी स्टॉल व प्रदर्शनीच्या माध्यमातून कोरफडच्या विविध उत्पादनाचा प्रचार व प्रसार करावा असे सांगितले. प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणात काजळा, पिरपिंपळगाव व जालना येथील महिला तसेच युवतीनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...