आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते आंबेगाव रस्त्यावर जीवरेखा नदीवर सुरू असलेल्या पुलाचे काम संथगतीने होत असल्याने पावसाळ्यात हा मार्ग शेतकऱ्यांसह वाहनधारकांसाठी अडचणीचा ठरू शकतो. जीवरेखा नदीला दरवर्षी तीन ते चार वेळा पूर येतो. याशिवाय नदीवर आमदार संतोष दानवे यांच्या माध्यमातून सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने पावसाळ्यात नदीचे पात्र पूर्णतः पाण्याने भरलेले असते. यातच जर मोठा पाऊस झालया तर नदीला येणाऱ्या पुरामुळे रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने सदर पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांनी काबरे यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने संबधित गुत्तेदाराला पुलाचे काम महिनाभरात पूर्ण करण्यासंदर्भात सुचविले आहे. दरम्यान पुलाच्या दोन स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीचे पाणी वळवून रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. दरम्यान परिसरात झालेल्या रिमझिम पावसामुळे नदीमध्ये सर्वत्र चिखल झाला परिणामी वाहतुकीसाठी सुरू केलेला पर्यायी मार्ग शेतकऱ्यांचा वाहनधारकांना अडचणीचा ठरत आहे. याठिकाणी दुचाकीस्वार घसरुन पडल्याने ही घटना घडल्या आहेत. पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने मोठ्या पावसानंतर रस्ता बंद होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खते व इतर साहित्य शेतात नेऊन पोच केली आहेत. दरम्यान, सदर पुलाचे काम संथ गतीने सुरू असून यामुळे शेतात जाताना अडचणी निर्माण होत आहेत. खरीप हंगामातील विविध कामासाठी शेतकऱ्यांना शेतात जाता येता यावे म्हणून पुलाचे काम जलद गतीने करावे अशी मागणी विष्णू जोशी, ज्ञानेश्वर डहाके, संजय निकम यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सदर पुलाचे काम संथ गतीने होत असल्याने पावसाळ्यात शेतात जाण्यास सह आंबेगाव गाडेगव्हाण तपोवन गोंधन या भागात जाणाऱ्या नागरिकांना पाण्यामुळे जाणेयेणे बंद करावे लागेल. यामुळे सदर शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या हितासाठी जीव रेखा नदीला पूर येण्याअगोदर पुलाचे काम होणे आवश्यक असल्याचे शेतकरी विष्णू जोशी म्हणाले.
पर्यायी रस्ता उपलब्ध केला जाईल
जीव रेखा नदीवरील पुलाचे काम वेगाने सुरू असून दोन स्लॅप पूर्ण झाल्यानंतर नदीपात्राच्या अर्ध्या भागातून पाणी वळवून ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभाग घेत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता काबरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.