आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वालसावंगी ते पारध रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत थांबवले; वाहनचालक त्रस्त

शेलूद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी ते पारध या रस्त्यावर ठेकेदाराने गिट्टी टाकून दोन महिने उलटले तरीही डांबरीकरण झाले नाही. यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या गिट्टीमुळे दुचाकीस्वार घसरुन पडून जखमी होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वाहनचालकांतून मागणी होत आहे.

वालसावंगी ते पारध हा तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता व जिल्ह्याला जोडणारा एकमेव रस्ता आहे. गेल्या काही दिवसापासून या रस्त्याच्या काम बंद झाल्याने या रस्त्यावरील टाकलेली गिट्टी उखडून जात आहे. यामुळे वाहनधारक वैतागून गेले आहेत.

चार महिन्यापुर्वी वालसावंगी पासुन पारध या चार किलोमीटर रस्त्याच्या कामास पावसाळ्यात सुरूवात करण्यात आली होती. मात्र ठेकेदाराने या कामास पुर्ण न करता अर्धवट सोडून दिले. रस्त्यावर खडीकरण करून डांबरीकरण होणे बाकी आहे मात्र आता दबाई फिरवली नसल्याने रस्ता पूर्ण खराब होत आहे. जर रस्ता लवकर नाही तयार झाल्यास रस्त्यावर अपघात घडून मोठी जिवितहानी शक्यता नाकारता येत नाही. वालसावंगी हे भोकरदन तालुक्यातील सर्वांत मोठे लोकसंख्या व बाजारपेठेचे गाव असल्याने दर रविवारी आठवडी बाजार भरतो. परंतु रस्त्यामुळे व्यापारी, शेतकरी त्रस्त झाल्याने याचा बाजारपेठेवर परिणाम होतो. वालसावंगी गावात कोचिंग क्लासेससाठी येणारे विद्यार्थी व शाळकरी मुलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबधितानी त्वरीत डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...