आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागात कुठेही शिक्षणाची सोय नव्हती. त्यावेळी शिक्षण घ्यावयाचे झाल्यास शहरी भागात जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. ही बाब गरीब विद्यार्थ्यांना परवडणारी नव्हती. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती होती. त्यामुळे कै. हसनराव देशमुख यांनी जिवाचे रान करुन १९८० साली रेणुकादेवी शिक्षण संस्था अतिशय हलाखीच्या परिस्थितीत उभी केली. ती आज सर्वांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने ४३ व्या वर्षात पदार्पण करीत असून, यशस्वीपणे भरभक्कपणे उभी आहे. दरम्यान, शिक्षण संस्थेने अनेक होतकरु विद्यार्थ्यांना बळ देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन रेणुकादेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वंसतराव देशमुख यांनी व्यक्त केले.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकादेवी शिक्षण संस्थेचा ४३ वा वर्धापण दिन बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठा ग्रामीण साहित्यिक रामराव रिंढे, विष्णू महाराज सास्ते, भास्कराव देशमुख, प्राचार्य डॉ. उमा सुर्वै, डी. एस.देशमुख, बबनराव गाढे, अरुण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वंसतराव देशमुख म्हणाले की संस्थेचा वर्धापण दिन साजरा करताना मोठा आनंद होतो आहे. कारण संस्था स्थापन झाली त्यावेळी वेगळे चिञ होते. आणि आज बघितले तर संस्थेचा यशस्वी डोलारा उभा पाहुन मनाला समाधान लाभते.शाळा हे मंदीर आहे आणि विद्यार्थी हेच दैवत आहे. हा विचार करुनच आमचे वडील कै.हसनराव देशमुख यांनी संस्थेची उभारणी केली आहे. त्याच विचारावर आज ही संस्था सुरू असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.तसेच बरेच विद्यार्थी रेणुकादेवी शिक्षण संस्थेतुन शिकुन बाहेर पडले आहे.
आज ते मोठ्या पदावर कार्यरत आहे. याचा आम्हाला आणि संस्थेला सार्थ अभिमान आहे.त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आपले आणि संस्थेचे नाव उज्वल करण्यासाठी कठीण परिश्रम घेण्याचे आवाहन देखील विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी रामराव रिंढे,विष्णू महाराज सास्ते आंदीचे देखील भाषणे झालीत.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी वृंद आदीनी मेहनत घेतली. कार्यक्रमात विष्णू महाराज सास्ते यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मी देखील या संस्थेचा विद्यार्थी आहे. आज वारकरी सांप्रदायात समाज-प्रबोधनाचे काम करीत आहे. संस्थेच्या संस्कारामुळेच शक्य झाल्याच्या भावना सास्ते महाराजांनी बोलवून दाखविल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.