आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा वाऱ्यावर:उष्णतेमुळे कामगार वापरणे टाळतात सुरक्षा साहित्य; फॅक्टरी इन्स्पेक्टरही ‘कागदोपत्री’

जालना / लहू गाढेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्क्रॅप तापविण्यासाठी इलेक्ट्रिक मशीनमधील वायरिंग जळाली. यानंतर नंतर गरम भट्टीत स्फोट होऊन गिताई कंपनीत झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. दरम्यान, भट्टीजवळ उष्णता असल्यामुळे अनेकांनी सुरक्षा साहित्य न वापरल्याने अनेकांच्या अंगावर भट्टीतील लोखंडी पाणी पडल्यामुळे जखमी झाले. दरम्यान, भट्टयांमध्ये स्फोट होण्याच्या चार घटनांत आठ जण जखमी झाल्याची चालू वर्षात नोंद आहे. लोखंडाच्या भट्टीजवळ उष्णता असल्यामुळे कामगार सुरक्षा साहित्य वापरणे टाळतात.

यामुळे किरकोळ अपघाताहून अनेकदा कामगार जखमी होण्याचे प्रकार वाढले असून कंपन्यांचे फॅक्टरी इन्स्पेक्टरही कागदोपत्री असल्याचे अपघातांतून दिसून येत आहे.जालना शहरातील गिताई कंपनीत मंगळवारी सकाळी लोखंड वितळणाऱ्या भट्टीत स्फोट होऊन सहा जण जखमी झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. जालन्याच्या औद्योगिक कंपन्यांमध्ये बहुतांश कामगार परराज्यातील आहेत. कोट्यवधींचा खर्च असलेल्या या कंपन्यांमध्ये कामगारांसाठी सुरक्षा साहित्य कंपन्यांच्या व्यवस्थापनांकडून केलेले असते. परंतु, भट्टीजवळ मोठ्या प्रमाणात उष्णता असल्यामुळे अनेक कामगार सुरक्षा साहित्य वापरत नाहीत.

यामुळे स्फोट झाला की, अनेकदा कामगार जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. कारखान्यातील कामगारांची सुरक्षा कल्याण व आरोग्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग काम पाहतो. यादृष्टीने जालना जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांनी सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्या जातात, याबाबतही आढावा घेतला जातो.

सुरक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
जालना एमआयडीसीमधील कंपन्यांची सुरक्षितता बघण्याचे काम औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी पाहतात. कामगारांना सुरक्षा साहित्य पुरवले जाते का, वारंवार भट्ट्यांमध्ये का स्फोट होतात, भट्ट्यांची नियमित दुरुस्ती होत नाही का, या प्रश्नांकडे हे अधिकारी वर्षभर कंपनीच्या तपासणीसाठी जातच नसल्याचे बोलले जात आहे.

अशी तयार होते भट्टी
बाहेरून आलेले स्क्रॅप, लोखंड भट्टीमध्ये तापवले जाते. नंतर कॅस्टर विनेटमधून धातू तयार होतो. नंतर तयार होणाऱ्या या बिलेटपासून टीएमटी बार तयार होऊन सळया तयार केल्या जातात.

या सुरक्षा साहित्यांची गरज
अॅप्रन, सेप्टी शूज, गॉगल, फेस मास्क, हेल्मेट, एअर सिलिंडर, सेफ्टी कोट, फायर फायटिंग मशिनरी, मशीनच्या धोकादायक भागांना संरक्षक जाळी बसवणे, मशिनरी गार्ड, ट्रिप गार्ड बसवणे, धोकादायक रसायने हाताळण्याचे प्रशिक्षण देणे, मशिनरीची नियमित तपासणी करण्याबरोबरच ६ महिन्यांतून एकदा मॉक ड्रिल प्रत्येक कारखान्यात होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...