आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील तालुका व ग्रामीण भागात व्यापाऱ्यांना संघटीत करून गावा-गावात शाखा उघडण्यात आली आहे. सर्वात अधिक शाखा उघडणारा व्यापारी संघटनेत महिलांना आरक्षण देणारा प्रत्येक व्यापाऱ्यांना मोफत विमा देणारा राज्यात एकमेव जालना जिल्हा आहे. कोरोनाच्या संकटात सर्वात अधिक नुकसान व्यापाऱ्यांना झाला आहे. शासकीय योजनेचे लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात गावो-गावी कार्यशाळा घेणार असल्याचे जनरल मर्चंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांनी सांगितले.
व्यापारी महासंघ, जनरल मर्चन्टस् असोसिएशन व भारतीय जैन संघटना जिल्हा जालनाच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण भागातील उद्योजक, लघु व महिला उद्योजक, कर सल्लागार, सीए, डॉक्टर, इंजिनिअर, बेरोजगार तरुणासाठी सुक्ष्म लघु एवम् मध्यम उद्यम अंतर्गत आत्मनिर्भर भारत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बाेलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदाबाद येथील राष्ट्रीय विशेषज्ञ निरंजन जुवा, सतिष पंच, दिपक भुरेवाल, सुखदेव बजाज, अंकुश राऊत, कासीम बावला, प्रविण मोहता, दिनेश राका, संतोष मुथ्था आदी उपस्थित होते. व्यापारी महासंघाचे जालना शहराध्यक्ष सतिष पंच म्हणाले, शासकीय याेजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच व्यवसायिकांनी कर्ज व अनुदानसाठी व्यापार्यांनी उद्यम नोंदणी करणे गरजेचे आहे.
प्रमुख वक्ता निरंजन जुवा यांनी शासकीय योजनेची तसेच नाममात्र व्याजाने कर्ज, अनुदान या बद्दल प्रोजेक्टर स्क्रिन द्वारे प्रस्तुत करून मार्गदर्शन केले. यासाठी सर्वांना अगोदर नोंदणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जगन्नाथ थोटे, विजय सुराणा, अतुल लढ्ढा, चेतन देसरडा, अजय पहाडे, कैलास लुंगाडे, राजेश बाठिया, महिला आघाडीची सिता मोहिते, आनंदी अय्यर, प्रिया जोशी, निता मुथ्था, मंजु कोटेचा, प्रविण मोहता आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. अभय सेठिया यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.