आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती रॅली:जागतिक एड्सदिनी जनजागृती रॅली

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रुग्णालय परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली. अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.अहिर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गायके, डॉ. मनीष सहानी, राजेश गायकवाड, तनुजा पाटील, विलास कांबळे, प्राजक्ता जोशी, विजय पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

रांगोळी व चित्रकला/पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण : या वेळी डॉ.राजेंद्र गायके यांनी या वर्षीची थीम “आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्यांकरिता’ अशी असल्याचे सांगून एड्स निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रारंभी एचआयव्ही/एड्सबाबत कलंक व भेदभाव मिटवून समानता आणणे या विषयावरील रांगोळी व चित्रकला/पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...