आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:मोजपुरी येथे जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून केला साजरा

सिंधी काळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. इंडीया आणि केऐपीसीएल यांच्या तर्फे मौजे मौजपुरी या गावामधे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन गाव परिसरात वृक्ष लगवड़ करण्यात आली. या मधे वड, पिंपळ, कडुलिंब अशा शास्त्रीय दृष्टिकोणातून महत्व असणाऱ्या वृक्षाची लगवड करण्यात येऊन महत्व सांगण्यात आले.

गावामधे पर्यावरण दिनाच्या निमिताने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे मधे इयत्ता १ली ते ८ वी पर्यंतच्या एकूण ३० विद्यार्थी व विद्यार्थनींनी सहभाग नोदवला. माझ्या संकल्पनेतील पर्यावरण व गाव परिसर या विषयावर विधार्थ्यानी चित्र तयार केले. तसेच प्रथम तीन विजेत्याना बक्षीसही देण्यात आले.या कार्यक्रमासाठी डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. इंडीया चे मुकेश त्रिपाठी, वीरेंद्र बंबूरे, तसेच केऐपीसीएल चे शरद खेडेकर, सचिन गायकवाड, प्रवीन एकुंडे, तुषार थिटे आदी सहभागी होते. या सोबत तुकाराम गोरे, सचिन बारड, भरत कलकुम्बे, लक्ष्मण डोंगरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...