आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रविवारी लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या नगर परिषद छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या क्रीडांगणावर मारवाडी युवामंच, मत्स्योदरी महिला मिडटाऊन यांनी उपलब्ध करून दिलेल्या वड, लिंब, उंबर, पिंपळ आणि चेरी या वृक्षांची अंबड शहरातील योग साधकांच्या उपस्थितीत लागवड करुन वृक्षारोपण कार्याचा शुभारंभ करण्याण आला.
शहरातील इतर खुल्या सार्वजनिक जागेवर वृक्ष लागवड करणे, संरक्षण आणि कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करणे बाबतीत चर्चा करण्यात आली. नगर परिषद, महसूल विभाग, स्थानिक पातळीवरील पतसंस्था, विविध बँका, सामाजिक वनीकरण आणि लोकसहभागातून रोपट्यांची लागवड, संवर्धन नियोजनासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले आहे.
याप्रसंगी डॉ. आशा मालू, मिनल मदान, पुनम गिल्डा, अरुण शर्मा, विक्रांत गिल्डा, कैलास राठी, पवन गिल्डा, अनिल पारधे, सिताराम वाघ, बाबासाहेब बांगर, नारायण तिकांडे, अंकुश चव्हाण, नारायण ढेंगळे, डॉ. वाय. बी. कुलकर्णी, डॉ. कल्याण जोशी, डॉ. भागवत कटारे, घनश्याम शिंदे, अॅड. रंगनाथ काफरे, अॅड. भागवत लहाने, अॅड. आशा गाडेकर, देवा चित्राल आदी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.