आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी परिवाराच्यावतीने रविवारी कुंडलिका नदीपर्यंत सायकल रॅली काढण्यात येऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. रोटरीच्या उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी रोटरीचे अध्यक्ष महेंद्र बागडी यांनी डॉ. सुमित्रा गादिया यांचे स्वागत केले. ही सायकल रॅली हॉटेल उडपी, सुभाष रोड, बस स्टँड रोड मार्गे जाऊन समस्त महाजन ट्रस्ट आणि कुंडलिका - सीना नदी पुनरुज्जीवन फाउंडेशनच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या कुंडलिका-सीना नदी येथील वृक्षारोपण उपक्रम स्थळावर समारोप करण्यात आला.
या रॅलीत रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र बागडी, संजय राठी, सागर कावना, अरुण अग्रवाल, शंकर राव, डॉ. अतुल जिंतुरकर, डॉ. अनुप कासलीवाल, डॉ. विजय जेथलिया, अनिल छाबडा, महेश माली, राजेंद्र भक्कड, भरत गादिया, मोहित भक्कड, श्रुती छाबडा, रवी भक्कड यांच्यासह रोटरी परिवारातील पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.