आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:तीर्थपुरीच्या मत्स्योदरी महाविद्यालयात जागतिक पर्यटन दिन साजरा

तीर्थपुरी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात भूगोल विभागाअंतर्गत २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त वैशाली हिंगे, प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड, जी. बी. धनेश्वर, राहुल बनसोडे, डॉ. प्रबोधन कळंब यांची उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. सुनील खांडेभराड यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटनाचे व्यावसायिक दृष्टीने तसेच जागतिक पर्यटन, भ्रमंती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यटनातून विविध प्रांताच्या बोलीभाषा, संस्कृती, नैसर्गिक वनस्पती, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, व राजकीय, विविधतेचे दर्शन घडते त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात भारत भ्रमंती करावी असेही आवाहन केले.

कार्यक्रमास डॉ. प्रदीप जाधव, डॉ. जायदा शेख, प्रा. रमेश जोगदंड, डॉ. रामलीला पवार, डॉ. शिवाजी तौर, प्रा. राहुल कांबळे, डॉ. कल्पना विटोरे, प्रा. पांडुरंग दगडे, प्रा. दिगंम्बर पवार,प्रा.डी. सि. खोजे, प्रा. गाढवे यादव, प्रा.योगेश घोगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्र संचालन डॉ.प्रदीप लगड यांनी तर प्रा.रेखा देशमुख यांनी आभार मानले.