आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा अर्चा:टेंभूर्णीत शीतलामातेचे केले पूजन‎

टेंभूर्णी‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील‎ माहेश्वरी समाजाकडून शीतलामातेचे‎ पूजन करण्यात आले.‎ होळीपासून पहिल्या दिवसांपासून ते‎ सात दिवसाच्या आत ही पूजा या‎ समाजाच्या वतीने करण्यात येते. ज्या‎ दिवशी ही पूजा केल्या जाते त्या दिवशी‎ या समाजाची मंडळी गरम जेवण करत‎ नाही. पहिल्या दिवशी स्वयंपाक करून‎ त्याचा नैवैद्य दाखविल्यानंतर हे अन्न‎ प्रसाद म्हणून ते खातात.

या दिवशी ते‎ कोणतेच गरम केलेले पदार्थ किंवा‎ जेवण दिवसभर करत नाहीत. या दिवशी‎ पपडी खाजा, राब, मेथी, भाजी, लापशी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असे पदार्थ करून ते खाण्याची प्रथा‎ आहे. या निमित्त टेंभुर्णी येथील सपकाळ‎ यांच्या मळयात जाऊन महिला मंडळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देवीची पूजा अर्चा करतात. दरम्यान,‎ यावेळी पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी‎ केली होती.‎

बातम्या आणखी आहेत...