आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीची दंगल:आन्वा पाडा येथे कुस्त्यांची दंगल, नामांकित मल्ल सहभागी

आन्वा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा येथे नागपंचमीनिमित्त कुस्तीची दंगल झाली. या स्पर्धेत १२० ते १३० मल्लांनी सहभाग घेतला होता. उद्घाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत जालना, सिल्लोड, औरंगाबाद, बुलडाणा, हळदा, शिवना, मोहळाई, हर्सूल, खान्देश तसेच दिल्लीतील एका मल्लाने सहभाग नोंदवला होता.

नागपंचमीला या परिसरात जुगार खेळण्याची परंपरा आहे. ही कुप्रथा मोडण्यासाठी ५० वर्षांपूर्वी ही कुस्त्यांची दंगल सुरू झाली असल्याचे कुस्ती कमिटीचे सदस्य सुनील सोनवणे यांनी सांगितले. शेवटची कुस्ती पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील मल्ल प्रवीण व दिल्ली इथून आलेला नसीम यांच्यात झाली. नसीमने बाजी मारली. स्पर्धेत जवळपास एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत बक्षिसांची लयलूट करण्यात आली. ग्रामीण भागात बरेच मल्ल तालमीत सहभाग घेत आहेत. भविष्यात चांगले मल्ल यातून तयार होतील, असा विश्वास अंकुश पहिलवान यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील मल्लांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत. शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच कुस्तीसाठी मॅट व इतर साहित्य उपलब्ध केले पाहिजे, असे कोच अंकुश भडक यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...