आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभागी:टेंभुर्णीत कुस्त्यांची दंगल; 300 मल्ल झाले सहभागी

टेंभूर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने शनिवारी कुस्तीची दंगल झाली. या कुस्ती स्पर्धेत जवळपास ३०० मल्लांनी सहभाग नोंदविला. शंभर रुपयांपासून ते अकरा हजार रुपयापर्यंत या ठिकाणी कुस्त्या खेळविल्या गेल्या. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शालिकराम म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महेश पतसंस्थेचे चेअरमन नंदलाल काबरा, दत्त संस्थानचे अध्यक्ष देवराव देशमुख, बालाजी जोशी, महादू भागवत, मुकुंद आवटी यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या मातीतला कुस्ती हा रांगडा खेळातून या खेळातून पहिलवान आपल्या खेळाचे डाव कसे पाडतात याकडे सर्वांचे लक्ष असते हा मैदानी खेळ असल्याने याचा आनंद ग्रामस्थांना घेता येतो असे प्रतिपादन म्हस्के यांनी केले. कुस्ती स्पर्धेचे आयोजक गौतम मस्के, भिकन पठाण, ज्ञानेश्वर उखर्डे, राजू खोत, शेख सैफु, धनराज देशमुख, संतोष पाचे, मुरली कुमकर, गजानन उखर्डे, लाला कुरेशी यांची उपस्थिती होती

बातम्या आणखी आहेत...