आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योगदिन:जागतिक योग दिनानिमित्त उद्या जिल्हा क्रीडा संकुल येथे योग शिबिर; केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या २१ जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी ६.४० वाजता योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. योग शिबीराचे उदघाटन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती राहणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...