आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करो योग:योगाभ्यासाने अनेक आजारांपासून मुक्ती ; योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

योग हे संगीतासारखे आहे. योग, प्राणायामामुळे शरीराची लय, मनाचा गोडवा आणि आत्म्याचा एकसंघपणा वाढतो, असे प्रतिपादन योगा अभ्यासक डॉ. राजकुमार सचदेव यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ जालना, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ इलाईट, समृद्धी ग्रुप, सिंधी पंचायत, कोठारी इंटरनॅशनल ड्रिम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘करो योग रहो निरोग’ या संकल्पनेतून योगाभ्यासालाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विनयकुमार कोठारी, डॉ. सुरेश साबू, तृप्ती कोठारी, श्रीकांत दाड आदींची उपस्थिती होती. तृप्ती कोठारी म्हणाल्या, योग आणि प्राणायाम म्हणजे सर्व विकारावर गोल्ड ट्रीटमेंट आहे. इलाईटचे अध्यक्ष श्रीकांत दाड यांनी योगाचे महत्व विषद केले.

मीनाक्षी दाड म्हणाल्या की, योगामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरूस्त बनून नवीन ऊर्जा प्राप्त होते. अध्यक्षीय भाषणात विनयकुमार कोठारी म्हणाले की, हल्ली प्रत्येकाच्या जीवनात धावपळ दिसून येते आहे. झोपतो तणावग्रस्त आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी योग व प्राणायाम केल्यास मानसिक शांतता लाभून आरोग्य सुदृढ बनते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार दाड, प्रसन्ना कोठारी, गोविंद सांखला, रामनारायण भक्कड, सागर कावणा यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जयश्री लड्ढा, मोहन राठोड, सुनीता टीबडेवाल, डॉ. कृष्णा लड्डा, डॉ. कैलास सचदेव, रश्मी टेकवानी, जितेश साधवानी, विजय गेही, सरोज कवराणी, अपेक्षा सचदेव, काजल नाथानी आदी उपस्थित होते