आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:जालन्याच्या योगशिक्षकांचा महायोगोत्सवात झाला गौरव

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे प्रथम योगशिक्षक संमेलन “महायोगोत्सव १० व ११ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे पार पडले. जालन्याच्या योगशिक्षकांनी केलेल्या कामगिरीबद्दल या सोहळ्यात कौतुकाची थाप पडली.

यावेळी स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला. या संमेलनात योगा फाउंडेशन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ अंतर्गत जालना जिल्हा कार्य समितीच्या जिल्हा अध्यक्षा मीरा थोरात, मनोज लोणकर, अनंत वाघमारे, अरुण जाधव, संपत कासार, हनुमान बर्वे, देविदास लंके व योगशिक्षिका मीरा थोरात, शिल्पा शेलगावकर, स्वप्नजा खोत, सुरेखा पवार, विद्या पंडित, शरयू पंडित, गीता कोल्हे यांची उपस्थिती होती. संमेलनात अध्यक्षाना स्मृतिचिन्ह व सर्व योग शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी मनोज लोणकर यांनी “ध्यान देण्याची प्राथमिक तयारी” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...