आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंतानी वाईट कृत्यास पाप म्हटले असून या आज कायद्याच्या भाषेत त्याला आपण गुन्हा म्हणतात. युवापिढी संत साहित्यापासून दूर गेल्यामुळे युवकांमध्ये गुन्हेगारी प्रमाण वाढले आहे. असे प्रतिपादन जेईएस महाविद्यालय जालना च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबीरात वरूड येथे अॅड. दिपक कोल्हे यांनी केले. जेईएस महाविद्यालय जालना च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे //"युवकांचा ध्यास, ग्राम -शहर विकास//" या विषयावर विशेष श्रम संस्कार शिबीराचे ३ ते ९ दरम्यान वरूड ता. जि. जालना येथे आयोजित करण्यात आले आहे.
५ रोजी दु. २.३० वा. बौध्दीक सत्रात संत साहित्य व कायदा यावर सरकारी अभियोक्ता अॅड. दिपक कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अॅड. देवराव डोंगरे होते तर व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे व प्रा. करण सातपुते यांची उपस्थिती होती.
यावेळी व्याख्याते म्हणून बोलतांना अॅड. दिपक कोल्हे म्हणाले की, आज युवापिढी वर संस्कार होण्याची गरज असून, युवकांनी संत साहित्याचा अभ्यास करावा त्यामुळे चांगले संस्कार होवून, वाईट कृत्यास आळा बसेल, पर्यायाने गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ मुक्ताबाई, जनाबाई आदी संताची उदारणे देवून जिवनातील त्याग, आदर्शची माहिती सांगितली, युवकांनी ज्ञानवंत व्हावे असे ही अॅड. कोल्हे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना अॅड. देवराव डोंगरे म्हणाले की, युवकांनी आदर्श नागरिक व्हावे, थोरा-मोठ्यांचा आदर करावा. त्यागातून मानवी जीवन समृद्ध व सुखी सुंदर होते. असे अॅड. डोंगरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य गोमटे यांनी केले तर विजय म्हस्के यांनी केले. यावेळी प्रा. दत्तात्रय भुतेकर ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.