आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकारणी नुसते वापरून घेतात. नंतर त्यांना काही देणे घेणे नसते. ही बाब विचारात घेता, युवकांनी राजकीय भानगडीत न पडता, स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारुन, पोटापाण्याचे बघावे नवनवीन उद्योग धंदे, आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे. सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शेतकरी, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी केले. मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी छञपती राजर्षी शाहू महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत ९ ठराव मंजूर करण्यात आले. यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना रास्त दरात बी-बियाणे, कीटकनाशक औषधी उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन छेडणे, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळा आणि महाविद्यालयात युवकांत जनजागृती करणे, पावसाळ्यात झाडे लावा झाडे जगवा अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान १ हजार वृक्ष लागवड करणे, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करून प्रत्येक तालुक्यात गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करणे, प्रत्येक रविवारी आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून अडचणी सोडविणे आणि प्रत्येक महिन्याला मराठा महासंघाची बैठक आयोजित करणे, जास्तीत जास्त युवक आणि युवतींना कै. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नेमणे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश मोफत मिळावा, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात यासाठी जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देणे, जिल्ह्यात तालुकानिहाय नवीन शाखा स्थापन करून मराठा महासंघाची ताकद वाढविणे, सभासद वृद्धि आदी ठरावांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष अशोक पडुळ, संतोष कऱ्हाळे, बबनराव गवारे, सुभाष चव्हाण, शैलैश देशमुख, कैलास देठे, बबन शेजुळ, बाबासाहेब देशमुख, कैलास सरकटे, संतोष ढेंगळे, शुभम टेकाळे, आकाश जगताप, बालाजी माने, अनिल मदन, विष्णु पिवळ, रोहित जाधव, आकाश ठोंबरे, योगेश गरड, कमलेश काथोटे, गणेश जाधव, उमेश कुटे, आकाश घोडे, योगेश पाटोळे, सूर्यकांत तौर, विठ्ठल गवारे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.