आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:तरुणांनी सामाजिक कार्याकडे वळावे; छावा  क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष गायकर यांचे आवाहन

श्रीक्षेत्र राजूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुणांनी राजकारण्यांच्या नादी न लागता व व्यसनाधीन च्या आहारी न जाता आपल्या आई वडिलांची सेवा करावी. सामाजिक कार्याकडे वळून विविध शिबिर, वाचनालय, आणि व्यायामशाळा उभी करून समाजामध्ये नाव करावं निश्चित चांगलं काम केल्याची पावती तुम्हाला मिळेल. असे प्रतिपादन छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी राजूर येथे छावा क्रांतीवीर सेनेचा कार्यकर्ता मेळावा व प्रवेश सोहळा प्रसंगी केले.

व्यासपीठावर संभाजीराजे जाधव, पंकज जराड, गंगाधर औताडे, दिनकर कांडेकर, परमेश्वर नाईकवाडे, अशोक खरात, राम मडके, संतोष सावंत, किशोर जोशी, कैलास भुतेकर ,वैभव दळवी जिल्हाध्यक्ष विनोद पुंगळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर नाईकवाडी यांनी सांगितले, समाजामध्ये काम करताना अनेक अडचणी संकटे येत असतात परंतु आपण खचून न जाता तरुणांनी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशानं काम केलं पाहिजे. विविध पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या मागे न फिरता स्वाभिमानाने व ताठ मानेने जगावे असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद पुंगळे यांची निवड करण्यात आली. यावेळी रामेश्वर पुंगळे, विठ्ठल पुंगळे, रवि मराठे, वैभव पडोळ, संतोष मोरे, दीपक भुमकर, रामेश्वर पुंगळे, अंकुश पुंगळे, सचिन पुंगळे, आविष्कार पुंगळे, वैजीनाथ पुंगळे, अकबर शहा, राम पुंगळे आदींनी क्रांतीवीर सेनेत प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...