आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:घाणेवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण मात्र अजून अस्पष्ट

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील घाणेवाडी येथे सोमवारी घडली. शंकर बबन पैठणकर (२५) असे मृताचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अजून समजले नसून, पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच घराच्या परिसरात दीडशे ते दोनशे ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याची माहिती मिळताच गावचे पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले. या प्रकाराबाबत त्यांनी चंदनझिरा पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांनी पोलिस येण्याअगोदरच मृतदेह खाली उतरविला होता, अशी माहिती पोलिस पाटील खंडाळे यांनी दिली. मृताच्या खिशात चिठ्ठी होती का, आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली याबाबतचा खुलासा अजून झालेला नाही. पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नाचण यांनी दिली.

मृताच्या कुटुंबीयांशी चर्चा करून तपास
मृत तरुणाला काही मानसिक ताण होता का, तो कोणत्या ठिकाणी काम करत होता, त्या ठिकाणी काही वाद होता का, कुणी बोलले होते का, या दृष्टीने मृताच्या कुटुंबीयांशी चर्चा करून पोलिसांचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...