आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:वालसा खालसा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपळगाव रेणुकाई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात असलेल्या गोठ्यातील अँगलला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे घडली. शुभम अविनाश सोनवणे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी शेतात गेलेल्या नागरिकांना शेतातील गोठ्यात लोखंडी अँगलला शुभमने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिस कर्मचारी दादाराव बोर्डे, विकास जाधव, गणेश घुसिंगे यांनी पंचनामा करून भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. दीपक सोनी यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. वालसा खालसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...