आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्देवी घटना:भोकरदनजवळ विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू ; दुपारी 2 वाजेदरम्यान घडली घटना

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील अन्वा रोड परिसरातील पळसखेळ बेचिराग येथील संतोप मिरकर यांच्या शेतात मंगळवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. या माधव वामन सोरमारे (१७, मासनपूर, ता.भोकरदन) असे मृत तरुणाचे नाव आहे. माधव हा शहरातील एका कापड दुकानात कामाला होता. आपल्या दोन मित्रांसोबत आन्वा रोडवरील पळसखेळ बेचिराग येथील शेतात गेला होता आणि शेतातील विहिरीत तिघे जण पोहत होते. सदरील विहिरीत पाणी जास्त होते.

यात माधव अचानक बुडाला सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून वाचवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरू करून काही तासाने माधव याला विहिरीतून बाहेर काढून भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डाॅ. दीपक सोनी यांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...