आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवासस्थानी बैठक:"एक दिवस माझ्यासाठी- कुटुंबातील‎ सर्वांसाठी'' संकल्पनेवर युवती मेळावा‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"एक दिवस माझ्यासाठी - कुटुंबातील‎ सर्वांसाठी"या थीमद्वारे जालन्यात २६ मार्च रोजी‎ युवती मेळावा घेण्यात येणार असुन त्या‎ नियोजनासाठी गुरुवारी संजय देशपांडे यांच्या‎ निवासस्थानी बैठक झाली.‎ कार्यक्रमांची रुपरेषा सांगताना दीपक रणनवरे‎ म्हणाले, हिंदू धर्मातील संस्कार, धर्म संस्कृती,‎ कुटुंब, जातीतच विवाह का? अलंकाराचे महत्व,‎ बांगड्या का घालायच्या, गंध, टिकली, कुंकू का‎लावावे. या हिंदु धर्म‎संस्कृती बद्दल माहिती‎देण्यात येणार आहे.‎मेळाव्यात सहभागी‎होण्यासाठी बारा वर्षापुढील‎ युवतींनी १५ मार्चपर्यंत विनाशुल्क नाव नोंदणी‎ करणे बंधनकारक आहे. असे सांगितले.

यावेळी‎ संजय देशपांडे, शालिनीताई पुराणिक, आनंदी‎ अय्यर, विशाखा नाईक यांनी मार्गदर्शन केले.‎ बैठकीस अनंत वाघमारे, लक्ष्मीकांत कुलकर्णी,‎ दिलीप देशपांडे, शशिकांत दाभाडकर, रघुनाथ‎ खरात, अॅड. विनोद कुलकर्णी, अॅड. सुबोध‎ किनगावकर, मधुसूदन दंडारे, अमोल मोहरील,‎ रुचिता शेवलीकर, सीमा सरपोतदार, अपर्णा राजे,‎ प्रतिभा खाडे, दीपा देशपांडे आदींची उपस्थिती‎ होती.‎ नांव नोंदणीसाठी शालिनी पुराणिक, आनंदी‎ अय्यर, विशाखा नाईक,अपर्णा राजे, प्रतीभा‎ खाडे, रुचिता शेवलीकर, अरुणा फुलमामडीकर,‎ शितल पळसखेडकर, मंजुषा घायाळ, मनिषा‎ वडगावकर, रोहिणी वावरे, सुनीता पालकर,‎ सुजाता कुलकर्णी, संजीवनी देशमुख, जया‎ देशमुख, जयश्री जोशी, वैशाली बोद्रे यांचेकडे‎ करता येणार असल्याचे सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...