आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुधारित जातींच्या कोंबडीपालनतून युवकांनी स्वयंरोजगार वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन क्रांती सिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. माणिक धुमाळ यांनी केले.कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी येथे मुक्त संचार कोंबडीपालन या विषयावर चार दिवसीय प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण सोनुने उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवकांना संकरित, सुधारित तथा गावरान कोंबडीपालनतून स्वयंरोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर किंवा पीक पद्धतीवर अवलंबून न राहता शेतीला पुरक व्यवसायाची जोड देऊन उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन करुन डॉ. सोनुने म्हणाले, केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांच्या यशोगाथा राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय कृषि मंत्री यांच्या हस्ते नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तिकेत समावेश झाल्याचा उल्लेख केला.
जिल्ह्यातील शेकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रद्वारे वेळोवेळो आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभाग घेऊन आपला फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. पशुधन विकास अधिकारी डॉ. सुयश तांगडे यांनी विविध कोंबडीपालन पद्धतीमधील कोंबड्याचा आहार कसा असावा, तो घरगुती पद्धतीने कसा बनवावा व खाद्यावरील खर्च कमी कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डिगंबर कांबळे यांनी शेतीबरोबरच पशुसंगोपन वाढवून दैनंदिन आर्थिक उत्पन्न वाढविणे गरजेचे असून यासाठी संरक्षित निवारा करून शेतावरच कोंबडीपालन, शेळीपालन व दुग्धवयवसाय यासारखे जोडव्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तिसऱ्या दिवशी पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश अक्षय यांनी कोंबड्याचे विविध आजार व लसीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
अंडी देणाऱ्या, मांसल कोंबडयाचे, पिल्लाचे संगोपन गृह निर्मिती, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे महत्व या विषयावर कृषि विज्ञान केंद्र येथील पशुवैद्यक तज्ञ डॉ. हनुमंत आगे यांनी प्रशिक्षणातील युवकांना या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच हा व्यवसाय मोठ्या संख्येत करण्यासाठी बँक प्रकल्प अहवाल तयार करताना काय काळजी घ्यावी व योग्य कागदपत्र जुळवणी याविषयावर डॉ. वैजनाथ फड यांनी माहिती दिली. या प्रशिक्षणात जिल्ह्य़ातील एकूण २८ युवकांनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.