आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजभान या सेवाभावी संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त तिर्थपुरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या काही मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, गोरगरीब आणि समाजातील वंचित घटकासाठी कार्य करणाऱ्या समाजभान टीमचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. केवळ जालना जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर समाजभान कार्याची व्याप्ती पसरली असून कुठेही नैसर्गिक संकट असो वा कसली आपत्ती समाजभान तिथे मदत करण्यासाठी सदैव तयार असते.
सामाजिक कार्य करणाऱ्या कुठल्याही कृतींना बळ देणं, कौतुक करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. समाजभानने आज दिलेला पुरस्कार हा आपल्या घराच्या मातीतला असल्यामुळे हा सन्मान माझ्यासाठी विशेष असून मला देण्यात आलेला हा पुरस्कार मी माझ्यासोबत कोरोना काळात जीवावर उद्धार होऊन रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस यांना समर्पित करत असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.
समाजभानसारखे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी नेहमी समर्पित भावना व सकारात्मक दृष्टीने काम केले पाहिजे असेही टोपे यांनी शेवटी सांगून समाजभानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. प्रवीण बांगर, उत्तमराव पवार, बाबासाहेब इंगळे, भाजपचे युवा नेते विश्वजित खरात, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, भाजपचे तालुकाप्रमुख शिवाजीराव बोबडे, सरपंच शामराव मुकणे, सुदामराव मुकणे, संभाजी देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक दादासाहेब थेटे यांनी केले. तर सूत्रसंचालन सोपान पाष्टे यांनी केले. या कार्यक्रमासाठी समाजभानचे शंकर बोबडे, गणेश गवते, दिपक नाईकवाडे, गणेश मिरकड, अशोक शिंदे, संदीप सातपुते, गणेश बोबडे, कैलास उढाण, दिनेश पघळ यांनी परिश्रम घेतले.
मान्यवरांना देण्यात आला पुरस्कार
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे, मनमंदिर मनोरुग्ण प्रकल्पाचे माधव पवार यांना समाजभान पुरस्काराने समाजभान टीमच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजभानच्या नवनिर्मितीतून राष्ट्रनिर्मितीकडे या कार्यपुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले. तर पोलीस दलातील गायक योगेश गायके यांनी समाजभानवर रचलेल्या गीताचे लॉंचिंगही यावेळी करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.