आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर प्रतिसाद:चौधरीनगर सार्वजनिक गणेश मित्र मंडळच्या शिबिराला तरुणांचा प्रतिसाद

सिंधी काळेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराजवळील चौधरी नगर येथील सार्वजनिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जालना येथील जनकल्याने रक्तपेटी मध्ये हे जमा करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गणेश उत्सव म्हटले की, सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. अकरा दिवस सर्वत्र गणेश मंडळाची धूम असते. या मध्ये विविध गणेश मंडळाच्या वतीने देखावे सादर करून जनजागृती करतात. जालना तालुक्यातील चौधरी नगर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जालना येथील जनकल्याण रक्त पेढीच्या वतीने उपस्थित गणेश भक्तांना रक्तदानाविषयी महत्व सांगून रक्तदान करण्याचे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले. या वेळी चौधरी नगरातील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले.

या वेळी ग्रामपंचयात चे सरपंच पंडित शिंदे, दशरथ चौधरी, गणेश तिडके, शरद छडीदार, विठ्ठल चव्हाण, माजी सदस्य प्रदीप फडे, सदस्य अक्षय भूरेवाल, संदीप चौधरी, गोरखनाथ पवार, नारायण माहोरे, शिवाजी टेके, राजू कोल्हे, सुरेश खरात, रोहित सोनी, मयूर एकलारे, रवी मते, रवी थोरात, गोविंद भूरेवाल, संदीप फड़े, प्रशांत भूरेवाल, शुभम वराड, राजेश सगट, वैभव खनके, कृष्णा कोल्हे, दिनेश जांगीड, रितेश तिडके, शुभम शेटे, संतोष थोरात यानी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...