आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेतुपुरस्सर दंड:तरुणाचा 15 ऑगस्टला आत्मदहना इशारा ; 3 लाखांच्या दंडाची पावती दिल्याचा आरोप

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळू नेण्याचा परवाना असतानाही त्या मोबदल्यात शासनाला कर भरण्याची रीतसर पावती असतानाही पोलिसांनी पावती दाखवूनही हायवा ठाण्यात लावला, तर तहसीलदार यांनी जाणूनबुजून ३ लाख ३७ हजार ४९८ रुपयांची दंडाची पावती दिली असल्याचा आरोप बाळू शिवाजी जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केला आहे. हा दंड मागे न घेतल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाळू शिवाजी जाधव (राजूर) यांनी निवेदनात दिला आहे.५ ब्रासचा वाहतूक परवाना असताना वाळू घेऊन जाणारा हायवा रस्त्यावर बंद पडला. हायवा बंद पडल्यामुळे पुढील ऑर्डर रद्द झाली. यामुळे ती वाळू जालन्यातच देण्याचे ठरले.

हायवा दुरुस्त करून ती वाळू नेत असताना सदर बाजार ठाण्याचे उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी हायवा थांबवला.त्यांना पावती दाखवण्यात आली. परंतु, पोलिसांनी तहसील कार्यालयात तपासणी केल्यानंतर ही गाडी सोडण्यात येईल, असे सांगून हायवा ठाण्यात लावला. यानंतर तहसीलदार जालना यांनी ३ लाख ३७ हजार ४९८ रुपयांची पावती दिली आहे. वाळूची वाहतूक ही रीतसर रॉयल्टी असतानाही हेतुपुरस्सरपणे हा दंड लावला असल्याचे वाळू वाहतूकदार बाळू शिवाजी जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. तरी ही गाडी तात्काळ सोडण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे जाधव यांनी केली आहे. नसता १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यात येणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...