आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप युवा मोर्चाच्या वतीने मागील वर्ष भराच्या काळात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा कार्य अहवाल युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी राजधानी दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष खा. तेजस्वी सूर्या यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या शिष्टमंडळात युवामोर्चाचे प्रदेशसरचिटणीस अनुप मोरे, सुशील मेंगडे, शिवानी दाणी यांचा समावेश होता. आगामी काळात युवा मोर्चाच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम, आगामी अजेंडा यावर खा. तेजस्वी सूर्या यांनी शिष्टमंडळाशी सुमारे तीन तास चर्चा केली.
धन्यवाद मोदीजी उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून सर्वाधिक ५ लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली आहेत. राहुल लोणीकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल खा. तेजस्वी सूर्या यांच्याहस्ते राहुल लोणीकर आणि सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील युवा वारियार शाखांचा विस्तार ग्रामपंचायत स्तरापर्यंत केला जाणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सुरू केलेल्या विविध समजयोगी योजना आणि त्यांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात झालेले सकारात्मक बदल १८ ते २४ वयोगटातील युवकांपर्यंत पोहचवण्यासाठी युवा मोर्चा महाविद्यालया पर्यंत पोहचणार आहे. नवमतदारांची नोंदणी करूनत्यांना भाजपाशी जोडण्याचा युवा मोर्चाचा अजेंडा असल्याची माहिती यावेळी भाजयुमो प्रदेशध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.