आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाचा हक्क:युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष लोणीकरांनी लोणीत बजावला मतदानाचा हक्क

परतूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया रविवारी पार पडली. माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी आपल्या मुळ गावी लोणी खुर्द येथे रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला.

राहुल लोणीकरांनी पत्नी दिव्या लोणीकर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेृत्वाखाली राज्यातील ७ हजार ५०० ग्रामपंचायतीपैकी ३ हजार ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा दावा यावेळी बोलतांना भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...