आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुद्ध पाणी:जिल्हा परिषदेचे सीईओ मनुज जिंदल यांनी केले योजनेचे उद्घाटन; सोनदेवकरांना 5 रुपयांत 15 लिटर पाणी​​​​​​​

सिंधी काळेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालूक्यातील सोनदेव धारा ग्रामपंचायतमध्ये १५ व्या वित्त आयोगातून ग्रामस्थाना पिण्यासाठी फिल्टरचे पाणी उपलब्ध होणार आहे. केवळ पाच रूपयात पंधरा लिटर पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थाना पावसाळ्यात रोगराई पासूनमुक्ती मिळणार आहे. उद्घाटन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाळ्यामध्ये पाणीपातळी वाढल्याने पाण्यामध्ये बदल होतात. त्यामुळे ग्रामस्थाना आजार होतात. परंतु पिण्यासाठी शुद्ध पाणी असल्याने या आजारपासून बचाव होतो. त्यामुळे सोनदेव धारा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामस्थाना पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सरपंच गजानन ढाकणे यांच्या हस्ते आरो फिल्टरचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच ढाकणे यांनी सीईओ यांच्यासमोर गावातील शाळा, आरोग्य व पाणी या यासंदर्भात मागण्या मांडल्या. याप्रसंगी महादेव घेंबड, उपसरपंच कैलास घेंबड, शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ मुंढे, ग्रामपंचायत सदस्य समाधान ढाकणे, अनिल माघाडे, केशव घेंबड, सुदामराव घेंबड, ग्रामसेवक कैलास लुंगाडे, अनंता ढाकणे, कारभारी आंधळे, गजानन शेजूळ यांच्यासह आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...