आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कार दुभाजकावर आदळून 1 ठार; दोघे जखमी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कार उलटून एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात औरंगाबाद-जालना रोडवर ओअॅस्टर शाळेजवळ रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडला. हरिदास घायवट (३०, रा. हातमाळी, ता. औरंगाबाद) असे मृताचे नाव आहे.

रात्री उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नाहीत. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड फाट्यापासून घायवट यांच्यासह अन्य दोघे चिकलठाणा येथे लग्नासाठी कारने (एमएच ४८, एस १७२४) निघाले होते. त्यांची कार जालना - औरंगाबाद रस्त्याने ओअॅस्टर स्कूलजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून उलटली.

बातम्या आणखी आहेत...