आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामुळे पदवी प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. ८ जून रोजी निकाल लागल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विचारणा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आवडत्या महाविद्यालयात आणि हव्या त्या विषयांना प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचाही अट्टहास असतो. पण प्रवेशासाठी आता “नो टेन्शन’ बारावीतील उत्तीर्ण १ लाख ५६ हजार १५ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेला यंदा १ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ५६ हजार १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या चारशे ते साडेचारशे महाविद्यालयांमध्ये एकूण १ लाख ३१ हजार ७०८ प्रवेश क्षमता आहे. याबरोबरच मराठवाड्यातील दुसरे विद्यापीठ म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ येथे ५१ हजार ३९३ जागा उपलब्ध आहेत. काही विद्यार्थी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश न घेता अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतात. शिवाय काही नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे आणि तुकड्यांची प्रवेश क्षमता वाढवली आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे परीक्षा न घेताच मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तीर्णतेची संख्या वाढली होती. प्रथम वर्ष प्रवेशातील वीस ते तीस टक्के जागा रिक्तही राहिल्या होत्या. यंदा मात्र पदवी प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. तसेच तुकड्या वाढवून मिळाल्याने अडीच ते तीन हजार जागा आणखी वाढतील. पदवी प्रवेशासाठी प्रक्रिया महाविद्यालय स्तरावर केली जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ म्हणाले.
शाखानिहाय प्रवेश क्षमता बीए ५४ हजार ५८ बीएस्सी ४० हजार ७८२ बीकॉम २४ हजार ३२८ बीसीए/बीसीएस १२ हजार ५४०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.