आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा उद्योग केंद्र:एमसीईडीतर्फे बेरोजगारांसाठी 1 महिन्याचे निःशुल्क प्रशिक्षण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडी आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने अनुसूचित जाती व सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना एक महिन्याचे निःशुल्क तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांनी एमसीईडी कार्यालयात थेट संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी ब्यूटी पार्लर, केमिकल प्रॉडक्ट्स, फॅशन डिझायनिंग, खुलताबादसाठी कापडी, कागदी पिशवी तयार करणे, वैजापूरसाठी घरगुती उपकरणे दुरुस्ती, सिल्लोडसाठी डिजिटल फोटोग्राफी आदी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी लॅपटॉप रिपेअरिंग, खुलताबाद-गारमेंट मेकिंग, वैजापूर-डिजिटल फोटोग्राफी, सिल्लोड-कापडी आणि कागदी पिशव्या, सोयगाव-अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. स्वत:चा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनाही प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी हाेता येईल. प्रशिक्षण विनामूल्य आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी वंदना चांदणे ( ९७६७६२११२४), अमित लोंढे (९६०४३०४६६८) यांच्याशी १० ऑक्टोबरपर्यंत संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...