आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या ५ हजार ६२ अहवालापैकी १ हजार २९१ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७७१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५२० अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३३ हजार ७ एवढी झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील ५४ वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील ५३ वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील ७० वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील ६४ वर्षाचा पुरुष, नांदेड येथील ७० वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील ४७ वर्षाची माहिला, खासगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील ९० वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील ५० वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील ६८ वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील ८० वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक २० ते २२ मार्च या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६५८ एवढी झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ७८.३४ टक्के आजच्या ५ हजार ६२ अहवालापैकी ३ हजार ३९० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३३ हजार ७ एवढी झाली असून यातील २५ हजार ८५५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६ हजार २६४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ६९ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. एकूण ३९२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.३४ टक्के आहे. जिल्ह्यात ६ हजार २६४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.