आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बँकर समितीची बैठक:एकाच दिवशी 1 हजार काेटींची कर्ज प्रकरणे मंजूर करणार : डॉ. कराड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय बँकर समिती म्हणजेच एसएलबीसीची १५६ वी बैठक ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी संत एकनाथ रंगमंदिरात एक हजार कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येतील. तसेच राज्यातील चारपैकी एक डिजिटल बॅँक शाखा गजानन मंदिर परिसरात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार दिली.

ही बैठक डाॅ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली हाेणार आहे. या बैठकीत वार्षिक पतपुरवठा धोरणासह विविध विषयांवर चर्चा आणि आढावा घेण्यात येइल. पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येइल. महिला बचत गट, आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत स्वनिधी, शेती पायाभूत सुविधा निधी, अॅग्रिकल्चर इन्फ्रा फंड, सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, प्राथमिकता प्राप्त क्षेत्र सूक्ष्म आणि लघुउद्योग, शिक्षण, गृहकर्जासह इतर योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे डाॅ. कराड यांनी सांगितले.

या बैठकीसाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केंद्र सरकारचे वित्तीय संचालक सुशीलकुमार सिंग, रिझर्व्ह बँकेच्या महाव्यवस्थापक कल्पना मोरे, राज्याचे वित्त प्रधान सचिव राजगोपाल देवरा, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामील होणार आहेत. नाबार्डचे सीजीएम जी. एस. रावल, बँक ऑफ महाराष्ट्राचे संचालक विजयकुमार, केंद्रीय वित्त विभागाचे संचालक सुशीलकुमार सिंग उपस्थित राहतील, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर भगवान घडमोडे, कचरू घोडके उपस्थित होते.

शहरात एक डिजिटल बँक शाखा
आता बँका डिजिटलाइझ करण्याचे काम सुरू आहे. आता डिजिटल करन्सीचा काळ आहे. त्यामुळे राज्यात चारपैकी एक डिजिटल बँक शाखा सुरू करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने नागपूर, मुंबईसह औरंगाबाद शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात बँक ऑफ महाराष्ट्राची डिजिटल बँक शाखा सुरू करण्यात येणार आहे. चौथी शाखा सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...