आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मनपाच्या आरोग्य केंद्रांत पायाभूत सुविधा नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन मनपाने मिशन आरोग्य हाती घेतले असून दहा कोटींची तरतूद केली आहे. मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेऊन या कामांना सुरुवात केली आहे. शहरातील अनेक आरोग्य केंद्रांत ओपीडी रूम चांगल्या नाहीत. काही आरोग्य केंद्रांचा स्लॅब गळतो, तर काहींच्या भिंती जुनाट झाल्या आहेत. आरोग्य अधिकाऱ्याची खोली अंधारलेली आहे.
अनेक वर्षांपासून आरोग्य केंद्रांमध्ये रंगरंगोटी झाली नाही. डॉक्टरांनाच बसण्यासाठी जागा नसल्यामुळे रुग्णांचा तर प्रश्नच येत नाही. या आरोग्य केंद्रात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील लाेक उपचारासाठी येतात. प्रशासक डॉ. चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी काही आरोग्य केंद्रांना भेट देऊन सोयी-सुविधांची पाहणी केली. सुधारणांसाठी मोठा वाव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ‘मिशन आरोग्य’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. यात प्रामुख्याने सिव्हिल वर्कबरोबरच प्रत्येक आरोग्य केंद्रात फर्निचरचे काम केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.