आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीनगरात होणार कारगिल उद्यान:पर्यटन विभाग देणार 10 कोटी ; अमरज्योतीसह तोफ, रणगाडे ठेवणारव

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ शिवाजीनगर परिसरातील विजयनगरात कारगिल उद्यान उभे राहणार आहे. यासाठी पर्यटन विभागाने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोमवारी (१० एप्रिल) सहकारमंत्री अतुल सावे, मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी जागेची पाहणी केली. कारगिल उद्यान उभारण्यासाठी यापूर्वी ही जागा सैनिक वेल्फेअर असोसिएशनला देण्यात आली होती. या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करून वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, निधीअभावी काम रखडले होते. आता पर्यटन विभागाने दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे.

दोन टप्प्यांत हा निधी देण्यात येणार असल्याचे शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले. वर्षभरात या उद्यानाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. शहीद जवानांच्या स्मरणार्थ हे उद्यान उभे करण्यात येणार आहे. यात सतत तेवत राहणारी अमरज्योती, युद्धात वापरलेल्या तोफा, रणगाडे आदी साहित्य ठेवण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल, अशा पद्धतीने हे उद्यान विकसित केले जाईल.

प्रशासकांकडून मकई गेट, चेतक घाेडा रस्त्याची पाहणी टाऊन हॉल ते मकई गेट रस्त्याचे काम रेंगाळले आहे. ‘दिव्य मराठी’ने याविषयी वृत्त प्रकाशित करताच सोमवारी मनपा प्रशासकांनी या रस्त्याची पाहणी केली. तसेच चेतक घोडा येथील रस्त्याच्या कामाला भेट दिली. या दोन्ही रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासकाने ठेकेदाराला खडे बाेल सुनावले.