आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर!:एकाचवेळी मिळणार दहावीचे गुणपत्रक आणि सनद; उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सनदसाठी वर्षभर पाहावी लागत होती वाट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालनंतर आजवर आठ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. आता मात्र निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देखील मिळणार असल्याची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.

मात्र गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यभरातील शाळा महाविद्यालय बंद आहेत. तर दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा रद्द करत नववीच्या मूल्यांकनावर आधारित दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला. यावेळी मूल्यांकनाची पद्धत बदलल्याने अनेक अडचणी बोर्डासह शाळांना आल्या आहेत.

नुकतेच लागलेल्या निकालातील त्रुटी दूर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना देखील काही शंका असल्यास दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान या लागलेल्या निकालाचे गुणपत्रक येत्या दहा-बारा दिवसांत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबरोबरच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर सनदसाठी वाट पहावी लागत असे ती सनद गुणपत्रिकेबरोबरच देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...