आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्तमजुरी:मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली.

पीडितेला नुकसान भरपाई मि‍ळावी यासाठी न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे हे प्रकरण वर्ग केले. नितीन म्हस्के (२१, रा. महाकाळ, अंकुशनगर, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, जानेवारी २०१८ मध्ये एका नातेवाईकाने पीडितेची व आरोपीची ओळख करून दिली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या वडिलांच्या मोबाइलवर फोन करून तिला आपण लग्न करू असे सांगितले. त्याला पीडितेने होकार दिला. त्यानंतर नितीनने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुलीचे पोट दुखत असल्याने आईने तिला रुग्णालयात नेले होते.

बातम्या आणखी आहेत...